ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
प्रिय देणगीदार,
ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे, ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात मराठी व इंग्रजी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक याच सोबत गुरुकुल आणि क्रीडाकुल असे औपचारिक शिक्षण विभाग कार्यरत आहेत. याचसोबत संगणक, अटल, कला, जैव तंत्रज्ञान हे औपचारिक शिक्षणासाठी पूरक विभाग येथे आहेत. याशिवाय विविध खेळ प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे दिले जाते.
आपल्यासारख्या देणगीदारांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक योगदानामुळे वरील सर्व उपक्रमांसाठी आवश्यक अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकत आहोत.
1. भारतीय नागरिकत्व व पॅनधारक असलेल्या व्यक्तींनी देणगी देण्यासाठी ही लिंक वापरावी.
2. परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनी देणगी देण्यासाठीची सोबतच्या लिंकमध्ये असलेली माहिती वापरावी.
3. देणगी बाबत कुठल्याही अडचणी आल्यास वा अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेल वर संपर्क करावा.